कोरोनामुळे लोकांची टेस्ट बदलली! आलं-तुळशीचा आरोग्यदायी केक बाजारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ख्रिसमस आणि न्यू ईयर पार्टी केकशिवाय अधुरी असते. ख्रिसमसला प्लम केकसह चॉकलेट ब्राऊनी, प्लम हनी, मिक्स प्रुट अशा विविध प्रकारच्या केकला मोठी मागणी असते. कोरोनामुळे आता लोकांची चॉईस बदलली असून इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने आरोग्यवर्धक पदार्थांच्या सेवनाकडे कल वाढलाय.

याचाच परिणाम म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात आता जिंजर केक, तुलसी केक, काढा केक यासारखे इम्युनिटी बुस्टर केक बेकरीचालकांकडून ग्राहकांच्या ऑर्डरनुसार बनवून दिले जातायत.

साधारण बेकरीत येणारे 35 टक्के लोक आता अशा इम्युनिटी बुस्टर केकची डिमांड करतायत. सर्वसाधारण केकपेक्षा या केकची किंमत 20 टक्के जास्त आहे. याबाबत शेफ बृजेश बहादूर सिंग सांगतात, जिंजर केकसोबत व्हिटामीन सी युक्त ऑरेंज पील केकलाही ग्राहकांची मोठी मागणी आहे. यात हाताने वाटलेल्या गरम मसाल्याचा समावेश असतो. याशिवाय गिफ्टचा पर्याय म्हणून आलं आणि सुंठीचा वापर करून खास पुकीजदेखील बाजारात उपलब्ध आहेत.