चुनाभट्टी– बीकेसी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची राष्ट्रवादीला घाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nawab-malik-ncp

चुनाभट्टीहून थेट वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडणाऱया नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याआधीच त्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली. पुलाचे काम पूर्ण होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे म्हणून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी जेसीबीवर चढत या पुलाच्या उद्घाटनाचा प्रयत्न केला. एमआरडीएच्या अधिकाऱयांनी आठ दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सांगत मलिकांना रोखले.

चुनाभट्टी ते बीकेसी जोडणाऱया उड्डाणपुलाचे काम पूर्व द्रुतगती मार्गावर सुरू आहे. मागील दोन वर्षांत या कामाला गती आली असून नवाब मलिक यांनी हा पूल आघाडीच्या काळात मंजूर झाला असल्याचा दावा केला आहे. तेव्हाच याचे काम सुरू झाले होते, मात्र त्यानंतर या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. काम पूर्ण होऊनही केवळ मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करावे म्हणून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याचा आरोप मलीक यांनी केला. मलिक यांनी कार्यकर्त्यांसह या उड्डाणपुलाजवळ जाऊन तेथिल बेरिकेटस् हटवले. जेसीबीवर चढत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी तत्काळ धाव घेऊन मलिक यांना असे करण्यापासून रोखले. पुलाचे काम आठवडय़ाभरात पूर्ण होणार असून त्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला होईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मलिक यांनी हे आंदोलन थांबवले.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार तसेच रुक्मिणीमातेस पारंपरिक अलंकार व सोन्याची साडी पोशाख परिधान करण्यात आला. देवाचे हे विलोभनीय रूपडे डोळ्यांत साठविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.