
परिसरात सुरळीतपणे काम सुरू ठेवण्यासाठी फायबर नेटवर्कचे काम करणाऱया पंपनीकडे खंडणी मागणाऱया एकाला चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे. भावेश परमार असे आरोपीचे नाव आहे.
पैलास पवार हे रेव्हमंक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत नोकरीला आहेत. या पंपनीचे मुंबई परिसरात ऑप्टीक फायबर केबलचे नेटवर्क आहे. भावेश परमार आणि लाल डोंगर परिसरात राहणारा आसीफ मनियार यांनी सप्टेंबर 2022मध्ये कैलास यांच्या कंपनीकडून 55 हजार रुपये परिसरात काम करताना अडथळा न आणण्यासाठी खंडणी म्हणून उकळले होते. दरम्यान, आसीफ याने पुन्हा 20 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. आरोपी दमदाटी करू लागल्याने घाबरून पैलास यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी भावेश परमार याला अटक केली. त्याच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. तर आसीफचा शोध घेत आहेत.





























































