सीआयएफचे मिशन फिट इंडिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवानांच्या आरोग्याला प्राधान्य देत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बला (सीआयएसएफ) ने  ‘फिट इंडिया मिशन’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत रविवारी मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांसाठी खारघर येथे सायकलिंग स्पर्धा आयोजित केली होती. सायकलिंग स्पर्धेत सीआयएफच्या 150 जवानांनी भाग घेतला.

देशातील महत्त्वाच्या ठिकाणी सीआयएफची सुरक्षा असते तेथे सीआयएसएफचे जवान कर्तव्य करत असतात. जवानांच्या आरोग्याला प्राधान्य देत सीआयएसएफने ‘फिट इंडिया मिशन’ सुरू केले. या उपक्रमाअंतर्गत आज नवी मुंबई येथे खारघरच्या सेंटर पार्प येथे 6 किलोमीटर सायकल स्पर्धेचे आयोजन केले होते.

सीआयएसएफचे उपमहानिरीक्षक श्रीकांत किशोर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या जवान-अधिकाऱयांचे कौतुक केले. कामाच्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिकरीत्या फिट असणे आवश्यक आहे. येत्या काळात सीआयएसएफच्या जवानांसाठी खो-खो आणि योग शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे उपमहानिरीक्षक श्रीकांत किशोर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सीआयएसएफचे उप कमांडंट एन. सी. यादव, एसबीआयचे के. के. विष्णोई आदी उपस्थित होते.