
जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या भूसंपादन विभागातील अव्वल क्लार्कला पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. शेतजमिनीवर असलेला ‘तबदिलीस मनाई’ हा शेरा काढून टाकण्यासाठी लाच घेतली होती. चारुदत्त शंकरराव गावडे (वय 57, रा. तासगाव) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.
तक्रारदार यांच्या शेतजमिनीच्या क्षेत्रावर असलेल्या ‘तबदिलीस मनाई’ हा शेरा कमी करून देण्यासाठी भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून गावडे यांनी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला होता.


























































