#WATCH: Protesters pelt stones on a police vehicle & attack it with sticks as protests erupt in Anantnag. #JammuAndKashmir. pic.twitter.com/N5rC0Uw8qD
— ANI (@ANI) August 22, 2018
सामना ऑनलाईन ।श्रीनगर
श्रीनगरमध्ये सध्या फुटिरतावाद्यांनी उच्छाद मांडला आहे. ईदच्या नमाजानंतर तेथील फुटिरतावाद्यांनी हिंदुस्थानच्या जवानांवर तुफान दगडफेक केली. तसेच यावेळी फुटिरतावाद्यांनी पाकिस्तानचे आणि इसिसचे झेंडे फडकवत घोषणाबाजी देखील केली. यामुळे श्रीनगरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या फुटिरतावाद्यांवर नियंत्रण मिळवण्याचे सुरक्षा दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत.
#JammuAndKashmir: People seen waving national flag of Pakistan and flag of ISIS (Islamic State in Iraq and Syria) in Srinagar. pic.twitter.com/i4STtWy49q
— ANI (@ANI) August 22, 2018
एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ ट्वीट केला असून श्रीनगरमधील भीषण वास्तव यातून समोर आलं आहे. फुटिरतावादी तेथील लोकांची माथी भडकवून हिंदुस्थानी जवानांच्या विरोधात वातावरण तयार करत आहेत. ईदनंतर तिथे जमलेल्या नागरिकांनी लष्कराच्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली. मात्र लष्कराचा वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत या अतीप्रचंड दगडफेकीतून मार्ग काढत लष्काराच्या जवानांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. तसेच या जमावावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील सध्या सुरू आहेत.
दरम्यान, कुलगाममध्ये झाझरीपोरा भागातील ईदगाह परिसरात दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला आहे.






























































