लय शाणा बनतोस का? वर्गात सर्व प्रश्नांची उत्तरे दिली म्हणून विद्यार्थ्याला चोपले

2365

वर्गात सर्व प्रश्नांची उत्तरे दिली म्हणून वर्गातल्या मुलांनी हुशार विद्यार्थ्याला चोपले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

हडपसर भागात एका शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याने वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे शिक्षकांनी त्याची प्रशंसा केली. तसेच या मुलाचा आदर्श घ्या असेही शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांना सांगितले. याला चिडून सात विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. विद्यार्थ्यांनी लोखंडाच्या पाईपने त्याला मारहाण केली आहे.

ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील आहे. पीडित विद्यार्थ्याचे वडील वकील आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आता सात विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली तो अभ्यासात खूप हुशार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी मुलाला मारहाण केली ती मुले या मुलावर खार खाऊन होती. कारण शिक्षक नेहमीच त्या विद्यार्थ्याचे उदाहरण द्यायचे तसेच या मुलांचे त्या हुशार मुलाशी तुलना करायची. रागाच्या भरात मधल्या सुटीत सात विद्यार्थ्यांनी त्या मुलाला मारहाण केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. सर्व मुलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी सुरू आहे, तसेच त्यांच्या पालकांचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या