
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर पाच महिन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विधिवत पूजा करून प्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत याची माहिती दिली.
डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस वर्षा बंगल्यावर शिफ्ट होतील असं सांगितलं जात होतं. मात्र, मागच्या जवळपास पाच महिन्यांपासून फडणवीस सागर बंगल्यावरच वास्तव्याला होते. वर्षा बंगल्यावरील छोटीमोठी कामे आणि मुलीची दहावीची परीक्षा असल्याने शिफ्ट होण्यास उशीर होत असल्याचे सांगितले जात होते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे दरे गावात
मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे वर्षा बंगल्यावर शिफ्ट झाले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सातारा जिह्यातील आपल्या दरे गावात गेले आहेत. एका धार्मिक कार्यक्रमासाठी ते दरेगावात आल्याची माहिती आहे.