
लातूर येथील जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री पंकजा मुंडे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांनी सामाजिक न्यायाची कास कधी सोडली नाही. महाराष्ट्रात भाजप आज जो मोठा झाला त्यामध्ये ज्या दोन-चार नेत्यांपैकी एक गोपीनाथ मुंडे असल्याचे त्यांनी सांगितले.