मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांना इडीकडून अटक

389

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांना इडीकडून अटक करण्यात आली आहे. रतुल पुरी हे मोजर बेयर कंपनीचे संचालक आहेत. 354 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवर सीबीआयने रतुल पुरी आणि चारजणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अंमलबजणी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंद कायद्याअंतर्गत त्यांना अटक केली. पाचही आरोपींना आज कोर्टात हजर केले जाईल.

2012 साली रतुल पुरी यांनी मोजर बेयर कंपनीच्या संचालकपदापासून राजीनामा दिला होता. असे असले तरी रतुल यांचे आई वडील दोघेही कंपनीच्या सदस्यपदी आहेत. आपाल्या भाच्याच्या व्यवसायाशी आपला संबंध नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिली आहे. ही कारवाई पक्षपातीपणाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या