
नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र यावेळी त्यांच्या जोडीला सुशील मोदी उपमुख्यमंत्रीपदी नसणार. एनडीए सरकारने यावेळी दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात सुशील मोदी यांचे नाव नाही. यावरच नितीश कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नितीश कुमार म्हणाले, ‘सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री न बनवण्याचा निर्णय भाजपचा आहे. याबाबत तुम्ही भाजपला विचारायला हवे. आमची युती आहे. आम्ही एकसोबत मिळून काम करत आहोत आणि मिळून काम करणार.’ ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला पुन्हा एक नवीन संधी मिळाली आहे. प्रत्येक वेळी काही ना काही नवीन असतंच.’
It is the decision of the BJP to not field Sushil Modi as the Deputy Chief Minister. They should be asked about this: Bihar Chief Minister Nitish Kumar https://t.co/zWyDZ3FBRt
— ANI (@ANI) November 16, 2020
दरम्यान, नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेली. त्यांच्यासोबतच 14 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात भाजपचे 7, जेडीयूचे 5, व्हीआयपी आणि हम पक्षातील एक-एक मंत्रीचा समावेश आहे. यावेळी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.



























































