
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्येत सुधारत असून दिवाळीत ते राज्यात परतण्याची शक्यता केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी वर्तवली आहे. नाईक हे भाजपचे कोअर समितीचे सदस्य आहेत, त्यांनी शुक्रवारी एम्स मध्ये पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली.
या बैठकीत नाईक यांनी पर्रीकरांसोबत गोव्यातील सद्य परिस्थितीवर चर्चा केली. तसेच कॅबिनेट मंत्र्यांना अतिरिक्त जवाबदारी द्यायची की नाही यावरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. नाईक म्हणाले की, “नेतृत्त्व बदलावर कुठलीच चर्चा नाही झाली. पर्रीकरांच्या तब्येतीत सुधारणा होत असून मुख्यमंत्रीपदी तेच राहतील.” दिवाळीत ते राज्यात परततील व कामकाज सुरू करतील अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली.


























































