मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

cm-uddhav-thackeray-pm-modi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारपासून दिल्ली दौऱ्यावर असून शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात होते. या भेटीवेळी कोणकोणत्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली हे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होणार आहे.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आणि ते पंतप्रधानांची भेट घेणार असल्याने या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या