मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान मोदी यांची चर्चा, कोरोना लसीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

modi-thackeray

देशात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली, अहमदाबादसह देशातील अनेक मेट्रो शहरांत मोठ्या प्रमाणावर कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आल्याने केंद्र आणि राज्य सरकार यांनी महत्त्वाची पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

याचसंदर्भात माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या व्हिडीओ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील कोरोनास्थितीची माहिती दिली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

यासोबतच कोरोनाच्या लसी संदर्भातही महत्त्वाची माहिती त्यांनी मोदींना दिली. ‘कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या