चिपी विमानतळाचा राज्यालाही फायदा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी विमानतळ सुरू होत आहे , त्याचा निश्चितच जिल्हय़ाला व राज्याला फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. राज्यात नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर येथील विमानतळावंर अधिक क्षमतेने हवाई वाहतूक सुरू केल्यास पर्यटक वाढून या भागांच्या विकासाला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हय़ालाच नव्हे तर कोकणाला मोठा फायदा होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले.