
सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीसंदर्भात या संकुलास भेट दिली व पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे : pic.twitter.com/5THgmf4D9I
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 22, 2021
सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या टिमशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, आमदार चेतन तुपे, सिरमचे अदर पुनावाला, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.
आगीबद्दल चौकशी केली जात आहे. म्हणून मला असं वाटतं की अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही.
ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांची पूर्ण जबाबदारी कंपनीने घेतली आहे. परंतु त्याव्यतिरिक्त आणखी काही करण्याची आवश्यकता असेल तर सरकार जरूर करेल. pic.twitter.com/a9Q9KG6DpC
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 22, 2021
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दुपारी पुणे येथील हडपसर परिसरातल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्याशी देखील चर्चा केली. pic.twitter.com/YgAx7cUO6k
— Saamana (@SaamanaOnline) January 22, 2021
मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचा हैदोस अद्यापही संपलेला नाही, गेल्या आठवडयात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला. लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली, दुदैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्यूमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे.
@adarpoonawalla जी आणि सायरस जी यांनी माहिती दिल्याप्रमाणे जिथे ही कोविडची लस बनविली जाते ते केंद्र इथून अंतरावर आहे आणि तिथे कोणतीही दुर्घटना घडली नाही किंवा त्याचा फटका तिथे बसलेला नाही. pic.twitter.com/JAc7809e2a
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 22, 2021
काल आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. लस उत्पादन केंद्रालाच आग लागली तर पुढे कसे होणार अशी सर्वांनाच भीती होती. मात्र कोविडची लस जिथे बनवली जाते, ते केंद्र अंतरावर आहे, सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे.
कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले.
सिरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना लसीच्या पुरवठयावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.