गेट वे ऑफ इंडियात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले विजय मशालीचे स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1971च्या युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानला चितपट केले. या विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त  देशभर ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे केले जात असून याचे स्मरण करणारी स्वर्णिम विजय मशाल देशभरात फिरविली जात आहे. दिल्ली येथून जैसलमेर, द्वारका, वडोदरा असे साडेचार हजार किमीचे अंतर पार करून ही मशाल आज मुंबईत दाखल झाली. गेट वे ऑफ इंडिया येथे विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मशालीचे शानदार स्वागत करण्यात आले.

सन 1971च्या या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या चक्र पुरस्कारार्थी ऍडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, ऍडमिरल विजयसिंग शेखावत, विंग कमांडर दिनेशचंद्र नायर, नायक धोंडिराम बनसोडे, वीरपत्नी श्रीमती सेलडा डायस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हिंदुस्थानी लष्कराच्या वाद्यवृंद पथकाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेफ्टनंट जनरल एस.के. प्राशर, एअर व्हॉईस मार्शल एस.आर. सिंग, वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हॉईस ऍडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह तिन्ही दलांचे अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थानने 1971मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या स्वर्णिम विजय मशालीचे बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. ही मशाल दिल्ली येथून जैसलमेर, द्वारका, वडोदरा असे साडेचार हजार किमीचे अंतर पार करून बुधवारी मुंबईत दाखल झाली. यावेळी राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, लेफ्टनंट जनरल एस. के. प्राशर, एअर व्हॉईस ऍडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह तिन्ही दलांचे अधिकारी उपस्थित होते.