
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता सहकार पॅनेलच्या 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी कैलास जेबले यांच्याकडे दाखल केले. प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सुनील राऊत, प्रसाद लाड, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, संदीप घनदाट, अभिजित अडसूळ, विठ्ठलराव भोसले, पुरुषोत्तम दळवी, अभिषेक घोसाळकर, आनंदराव गोळे, विष्णू घुमरे, अनिल गजरे, जयश्री पांचाळ, जिजाबा पवार, सोनदेव पाटील, विनोद बोरसे, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, नितीन बनकर या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. या पॅनेलच्या उमेदवारांसमोर काही मोजक्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून तेही अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


























































