हितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी

186

सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने लागू केलेल्या नव्या आचारसंहितेमुळे देशातील आजी-माजी क्रिकेटपटूंच्या हितसंबंध वादप्रकरणी बीसीसीआय प्रशासकीय समितीला (सीओए) नित्याच्या  कामकाजात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी ‘श्वेतपत्रिका’ काढून पुढील कारवाई करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतल्याची माहिती समितीच्या सदस्य डायना एडुल्जी यांनी सोमवारी दिली.

विशेषतः  माजी क्रिकेटर्सना खेळाडू -समालोचक, समालोचक -आयपीएल स्टाफ, बीसीसीआय पदाधिकारी – आयपीएल स्टाफ अशी दुहेरी भूमिका पार पाडताना हितसंबंधांच्या वादाला सामोरे जावे लागत आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमामुळे अडचणीत सापडलेल्या खेळाडूंशी चर्चा करूनच पुढील तोडगा काढण्याचा विचार असल्याचे एडुल्जी आणि सीओएचे दुसरे सदस्य निवृत्त लेफ्ट. जनरल रवी थोडगे यांनी माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, सौरभ गांगुली यांच्यासह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंशी याप्रकरणी चर्चा करीत श्वेतपत्रिका काढत पुढील कार्यवाही करण्याची शिफारस सोमवारच्या बैठकीनंतर केली. दरम्यान, माजी कसोटीपटू व्यंकटेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली बोर्डाच्या समितीने टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक निवडीसाठी मुलाखतींना सोमवारी सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या