कोळसा क्षेत्रातील संघटनांचा देशव्यापी संप; वीजनिर्मितीची समस्या

474

कोळसा क्षेत्रातील कामगार संघटनांनी सोमवारपासून पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे चंद्रपूर वीज केंद्र संकटात सापडलं आहे. सध्या वीज केंद्राकडे अडीच दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. भारतीय मजदूर संघ आजपासून पाच दिवस, तर इंटक, आयटक, सीटू या संघटना मंगळवारी एक दिवसाचा संप करणार आहे.

या संपामुळे कोळसा खाणीतील उत्पादन बंद राहील. त्यामुळे वीज केंद्राला होणारा कोळसा पुरावठाही ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडीच दिवसात या केंद्राला कोळसा मिळाला नाही, तर विजेचे उत्पादन कमी करण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी वीज केंद्र व्यवस्थापनाने नियोजन केले असून 500 मेगावॉटचा एक संच देखभाल दुरुस्तीसाठी काढण्यात येणार आहे. सध्या वीज केंद्रातून 1500 मेगावॉट वीज निर्मिती सुरु आहे. ती एक हजारवर येईल. त्यामुळे राज्यावर वीज संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या