कॉलेजांची फी हप्त्यांमध्ये घेण्याचे निर्देश द्या! युवा सेनेची तंत्रशिक्षण संचालकांकडे मागणी

521
yuva-sena

काही इंजिनियरिंग महाविद्यालये विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाची फी घेण्याची सक्ती करत असल्याने राज्यातील सर्व महाविद्यालयांनी 2020-21 वर्षाची फी हप्त्याने घ्यावी असे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी युवा सेनेने राज्याच्या तंत्रशिक्षण संचालकांकडे केली आहे.

कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षाची संपूर्ण फी ऑनलाईन भरावी अशी नोटीस काढली आहे. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी युवासेनाप्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युवा सेनेच्या वतीने तंत्रशिक्षण संचालक  डॉ. अभय वाघ यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना तूर्त पूर्ण फी भरणे शक्य नसल्याने किमान तीन ते चार हप्त्यांमध्ये फी घेण्याचे निर्देश महाविद्यालयांना द्यावेत असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी हे निवेदन दिल्याची माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या