
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 1 मेपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी आता 1808.50 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. याआधी 1 एप्रिलला व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 91.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा दर कमी केल्याने मागील दोन महिन्यांत सिलिंडर 263 रुपयांनी स्वस्त झाला आहे.






























































