किमान समान कार्यक्रमाशिवाय कुणाला काहीही लिहून दिलेले नाही

1599
eknath-shinde

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे चालले आहे. याच आमच्या अटी-शर्ती आहेत. याशिवाय कुणाला काहीही शिवसेनेने लिहून दिलेले नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

घटनाबाह्य काम करणार नाही असे शिवसेनेकडून लिहून घेतलेय. उद्देशाबाहेर काम केले तर सरकारमधून बाहेर पडू, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी केले होते. चव्हाण यांचे हे वक्तव्य नगरविकास मंत्री शिंदे यांनी खोडून काढले आहे. संविधानाच्या चौकटीतून सरकार चालविण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आणि तसेच सरकार चालणार. किमान समान कार्यक्रमाशिवाय कुणाला काही लिहून दिलेले नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

काय म्हणाले अशोक चव्हाण…

महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. असे न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायच्या सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची कल्पना शिवसेनेला देण्यात आली आहे. तसेच घटनाबाह्य काम करणार नाही असे शिकसेनेकडून लिहून घेतले आहे, असे अशोक चव्हाण रविवारी नांदेड येथे एका कार्यक्रमात म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या