बस आणि लोकलसाठी एकच तिकीट! ‘बेस्ट’च्या ताफ्यात 28 इलेक्ट्रिक बस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट बस आणि लोकल ट्रेन या मुंबईकरांच्या जीवनवाहिन्या आहेत. या दोन सेवांशी प्रत्येकाचा संबंध आलेला आहे. बेस्टचे आधुनिकीकरण होत आहे. शिवसेनेने निवडणुकीतील वचननाम्यात दिलेल्या वचनाप्रमाणे बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा एकच तिकीट यापुढे चालेल असे नियोजन करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या 74व्या  वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहीम बसस्थानकाचे लोकार्पण आणि पर्यावरणस्नेही 28 इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

देशाचा पंतप्रधान कंडक्टरसारखा असावा!

बेस्टचा कंडक्टर सतत, सर्वांना ‘आगे बढो, आगे बढो’ असे आवाहन करत असतो. देशाचा पंतप्रधानही तसाच ‘आगे बढो’ म्हणणारा असला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्ट पंडक्टरच्या कामाचे काwतुक केले.

लोकल, रेस्टॉरंटबाबत चार पाच दिवसांत निर्णय

लोकल ट्रेन सुरू करण्याची सर्वांची मागणी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तसे एक एक पाऊल आपण पुढे टाकत आहोत; पण आपले पाऊल चुकीचे पडत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. मुंबई व इतर ठिकाणी कोरोना कमी झाला आहे, पण तो उलटणार नाही ना हे पाहिले पाहिजे. रेस्टॉरंट व ट्रेन सुरू करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. पण त्यापूर्वी आपली डॉक्टर व पालिका अधिकाऱयांशी चर्चा सुरू आहे. आपण काय, कधी सुरू करणार याच्या सूचना चार-पाच दिवसांत सरकारच्या वतीने दिल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.