
सामना ऑनलाईन । मुंबई
उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार व अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका मुलाखातीदरम्यान हिंदू हा सर्वात हिंसक धर्म असल्याचे वक्तव्य उर्मिला मातोंडकरने केले होते. याविरोधात पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली होती. आता उर्मिला मातोंडकरचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपची पोलिसात तक्रार
इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान उर्मिला म्हणाली की, “हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म होता. परंतु हिंदु धर्माचे रुपांतर आता जगातल्या सर्वात हिंसक धर्मात झाले आहे.” यावर भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी उर्मिला मातोंडकर विरोधात तक्रार केली होती. आता उर्मिला मातोंडकर विरोधात चैतन्य जोशी यांनी निवडणूक आयोगाकड तक्रार केली आहे. तसेच उर्मिला मातोंडकरांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी विनंतीही त्यांनी आयोगाकडे केली आहे.
मुंबई उत्तर मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी हिंदूविरोधात वक्तव्य केले आहे.यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत तसेच आचारसंहितेचेही उल्लंघन झाल्याचे जोशींनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकरांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी विनंती जोशी यांनी केली आहे.





























































