
मुंबई आणि उपनगरांतील कोळीवाडय़ांसाठी सर्वंकष विकास मॉडेल तयार करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला. त्यासाठी कोळीवाडय़ांचे सीमांकन आणि विकास नियंत्रण नियमावलीसाठी स्वतंत्र समित्या तयार करून त्यात तज्ञ मंडळी आणि स्थानिकांचा समावेश केला जाणार आहे. मुंबई शहर व उपनगर परिसरातील गावठाणे आणि कोळीवाडय़ांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.


























































