भाजपचे चार आमदार माझ्या संपर्कात, कॉम्प्युटर बाबांंचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इंदूर

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे निकटवर्तीय असलेले कॉम्प्युटर बाबा यांनी भाजपचे चार आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. बुधवारी भाजपच्या दोन आमदारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान करून भाजपचा धक्का दिल्यानंतर आता कॉम्प्युटर बाबांच्या या दाव्याने पुन्हा एकदा भाजपच्या गोत्यात खळबळ उडाली आहे.

‘भाजपचे चार आमदार माझ्या संपर्कात आहेत तसेच त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा देखील आहे. योग्य वेळ आली किंवा मुख्यमंत्री कमलनाथ सांगतील तेव्हा मी त्यांना सर्वांसमोर आणेन’, असे कॉम्प्युटर बाबांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

बुधवारी मध्य प्रदेश विधानसभेत गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयकासाठी झालेल्या मतदानात दोन भाजप आमदार नारायण त्रिपाठी व शरद कोल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. त्यानंतर त्या दोघांनाही काँग्रेसने अज्ञातस्थळी नेले होते व तिथे त्या दोन्ही आमदारांसोबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भोजन केल्याचे समजते.