
बेस्ट उपक्रमाने दोन्ही लस घेतलेल्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवास करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्याविषयीचा आदेश सर्वच कर्मचाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने मंगळवारी काही ठिकाणी प्रवाशांचे युनिव्हर्सल पास तपासले तर काही ठिकाणी युनिव्हर्सल पास न विचारताच कंडक्टरने तिकीट फाडले. आदेशाची मंगळवारी काही ठिकाणी अंमलबजावणी झाली तरी बऱ्याच ठिकाणी कसलीच तपासणी झाली नाही. यामुळे गोंधळाचे चित्र निर्माण झाले होते, मात्र उद्यापासून या आदेशाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. बेस्टचा उद्देश चांगला असला तरीही या निर्णयाची अंमलबजावणी करणे कसोटीचे ठरणार आहे.




























































