काँग्रेसच्या अकराव्या यादीत 17 उमेदवारांची नावे; आंध्रात मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या बहिणीला तिकीट

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांची बहीण आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. रेड्डी यांची कन्या शर्मिला यांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने आज लोकसभेच्या उमेदवारांची 11 वी यादी जाहीर केली. त्यात 4 राज्यांतील 17 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत 231 उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे.

 दहाव्या यादीत तेलंगणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका लोकसभा जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात पक्षाने महाराष्ट्रातील अकोल्यातून अभय काशीनाथ पाटील आणि वारंगळमधून काडियाम काव्या यांना उमेदवारी दिली आहे. बिहारसाठी काँग्रेसने पहिल्या यादीत दोन मुस्लिम नेत्यांना तिकीट दिले आहे. मोहम्मद जावेद हे किशनगंजचे विद्यमान खासदार आहेत. अजित शर्मा हे आमदार आहेत. दरम्यान, आठव्या यादीत काँग्रेसने 4 राज्यांतील 14 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. सातव्या यादीत छत्तीसगडच्या सुरगुजा मतदारसंघातून शशी सिंह, रायगडमधून मनेका देवी सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.