आपल्याकडे दातेंसारखे पत्रकार पण, मोदी पत्रकार परिषद घेतील तेव्हा ना… काँग्रेसचा पंतप्रधानांवर प्रश्नाचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील पत्रकार शिरिष दाते यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्याकडे दातेंसारखे पत्रकार आहेत पण मोदीजी पत्रकार परिषद घेतील तेव्हा ना…असे ट्विट करीत काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी टोला मारला आहे.


अमेरिकेतील पत्रकार शिरिष दाते यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. मूळ आपल्या देशाचे असलेले पत्रकार दाते यांनी ट्रम्प यांना प्रश्न केला आपल्या देशात दातेंसारखे अनेक पत्रकार आहेत. आता हिंमत अधिक लागते हे खरे आहे. पण मोदीजी पत्रकार परिषद घेतील तेव्हा ना, असा उपरोधिक टोला मारत त्यांनी मोदींवर काँग्रेसने प्रश्नांचा पाऊस पाडला आहे. हिंदुस्थानात एन 95 मास्क, पीपीई किट्स व व व्हेंटिलेटर बनवले जात नव्हते हे असत्य नाही का, आत्मनिर्भर भारत ही स्वातंत्र्यापासून संकल्पना नाही का, गेल्या पाच वर्षात चीनकडून आयात दुपटीने वाढली का, चीनचे नावही का घेत नाही असे प्रश्न सावंत यांनी यानिमित्ताने उपस्थित केले.