अहंकारी भाजपला जनतेने नाकारले! काँग्रेसची अपक्षांना सोबत येण्यासाठी साद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ashok-gehlot

सामना ऑनलाईन । भोपाळ

अहंकारी भाजपला जनतेने पूर्णत: नाकारले आहे. कोणीही भाजपच्या कामावर समाधानी नाहीत. अच्छे दिन आलेच नाहीत. मध्यप्रदेशात बहुमताचे आकडे कुणालाही गाठता आलेले नसले तरी देखील जनतेने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अपक्षांनी इच्छा असल्यास आम्हाला साथ द्यावी अशी प्रतिक्रिया काँग्रसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी दिली आहे.

मध्यप्रदेशच्या निकाला भाजप-काँग्रेसमध्ये चुरस आहे. मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षांचे आकडे अगदी छोट्या फरकाने हलत आहेत. त्यामुळे नक्की कोण सत्ता स्थापन करणार अशी उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे अपक्षांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने अपक्षांना आपल्यासोबत येण्यासाठी साद घातली आहे.