काँग्रेसला सत्तेत येण्याची संधीच नाही, घराणेशाहीमुळेच दारुण स्थिती झाली!

1422

‘काँग्रेसला सत्तेत येण्याची आता संधीच नाही, घराणेशाहीमुळेच काँग्रेसची दारुणस्थिती झालेली आहे. तरीही लातुरात काँग्रेसने घराणेशाही जोपासण्याचे काम केले आहे. एकाच घरात दोघांना उमेदवारी दिली आहे. मतदारांनीच ही घराणेशाही संपवावी’, असे अवाहन लातुरातील जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते अ‍ॅड. मनोहरराव गोमारे व शिवदास लखादिवे यांनी पत्रकार परिषदेत केले.

अनेक वर्षाच्या सत्ताकारणामुळे काँग्रेसमध्ये घराणेशाही, सरंजामशाही व एकाधिकारशाही निर्माण झालेली आहे. सत्तेच्या माध्यमातून वाम मार्गाने गडगंज संपत्ती जमा करून त्यांच्या भावी पिढ्यांची सोय करून ठेवली आहे. स्वार्थी विचारांमुळे आणि सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केल्यामुळे त्या पक्षांना आता पुन्हा सत्ता संपादनाची संधीच मिळणार नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे सत्ता भोगलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी स्वार्थासाठी पक्षांतर केले आहे.

काँग्रेसमधले बंडोबा जेव्हा झाले थंडोबा

लातुरात काँग्रेसच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास झाला नाही तर सत्ताधाऱ्यांचाच विकास झाला आहे. शहरातील डालडा फॅक्ट्री, जवाहर सहकारी सुतगिरणी, इंदिरा सुत गिरणी बंद करण्याचे पाप काँग्रेसचेच आहे. प्रियदर्शनी सुतगिरणीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट्राचार त्यांनी केला आहे. एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न झाला नाही. नेते मंडळींनीच मोक्याच्या जागा शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, सिनेमागृह, मंगल कार्यालये आणि इतर कारणांसाठी मिळवून घेतल्या.

लातूरमध्ये काँग्रेसला वंचित आघाडीच्या उमेदवाराची धास्ती

शहर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार मुंबईला राहून आपले उद्योगधंदे सांभाळतात. असे आमदार हवेत कशाला याचा विचार मतदारांनी करावा असेही अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांनी म्हटले. काँग्रेसला घराणेशाहीचा लागलेला रोग आहे. लातुरातील संपूर्ण देशमुख कुटुंब आता प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले आहे. त्यांना मतदारांच्या समस्यांशी कांहीदेणे घेणे नाही तर केवळ घराण्याची प्रतिष्ठा महत्वाची आहे. ही घराणेशाही मतदारांनी संपवावी असे आवाहनही त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या