काँग्रेसमध्ये पुत्रमोह, काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसमध्ये पुत्रमोह आहे असा घाणाघात काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे माजी सचिव पंकज शंकर यांनी केला आहे. तसेच राजकारणात राहुल गांधी हे शिकाऊ आहेत असेही पंकज शंकर म्हणाले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलतना शंकर म्हणाले की, “2004 साली राहुल गांधी राजकारणात आले. सध्या 2019 सुरू आहे. युवा काँग्रेस आणि विद्यार्थी संघटनेत नवीन प्रयोग सुरू आहेत. अमेठीत राहुल गांधी यांना पराभव पत्करावा लागला. आता नवीन प्रयोग काय असणार? पक्षात आता उरले काय?” हा पुत्रमोहच आहे असे शंकर म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधींकडे असती तर पक्षाची इतकी दैना झाली नसती असेही त्यांनी यावेळी नमूद केले.