महाविकास आघाडी लोकसभेच्या 35 जागा जिंकेल; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

prithviraj-chavan

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात एपूणच भाजपच्या विरोधात वातावरण अनुभवास येत आहे. महाराष्ट्रातले चित्र काही वेगळे नाही. राज्यातील महाविकास आघाडी लोकसभेच्या 32 ते 35 जागा जिंकेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील जनतेचा काwल हा एपंदरीत भाजपच्या विरोधात दिसून येत आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक गैरव्यवहार, नैतिक भ्रष्टाचार आणि संविधान बचाव हे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरत आहेत. विशेष म्हणजे, या पाचही मुद्दय़ांवर मोदी स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. भाजपकडून 2047 सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र, त्याविषयी त्यांच्याकडे कोणतेही धोरण नसल्याचे चव्हाण म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लोकांची सहानुभूती आहे, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. त्यामुळे महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील. यामध्ये काँग्रेसला 12 जागांवर यश मिळू शकते. शिंदे गटाला तीन ते चार जागा मिळण्याचा अंदाज असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भाजपने गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन केली; पण सध्या बहुमताचा 272 चा आकडा गाठणेही भाजपला अवघड दिसत आहे.

400 पारचा नारा संविधान बदलासाठी आहे

‘चार सो पार’चा नारा हा संविधान बदलासाठी आहे, त्यामुळे दलित समाज विशेषतः आंबेडकरी समाज भाजपच्या विरोधात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एमआयएमबरोबर युती होती. त्यामुळे त्यांना सहा टक्के मते मिळाली होती. या वेळी युती नसल्याने वंचितची मते कमी होतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

इंडिया आघाडीला चांगले यश मिळेल

देशपातळीवर इंडिया आघाडीलाही चांगले यश मिळेल. इंडिया आघाडीला देशभरात साधारण 240 ते 260 जागा मिळतील. याउलट 2019 च्या तुलनेत एकाही राज्यात भाजपच्या जागा वाढतील असे दिसत नाही. अबकी बार चार सो पार ही घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगलट येताना दिसत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.