महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका – वर्षा गायकवाड

हिंदीसक्तीच्या मुद्यावरून तोंडघशी पडलेल्या महायुती सरकारला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी आज जोरदार इशारा दिला. ‘भाजपने जाणीवपूर्वक हा वाद उकरून काढला होता. मराठी माणूस एकवटल्याने अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र हा लढा एका जीआरपुरता मर्यादित नाही. मराठी अस्मितेवर घाला घालणाया कोणत्याही निर्णयाला यापुढेही कायम विरोध होईल. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका, ते महागात पडेल. मराठीचा मानसन्मान टिकवण्यासाठी भविष्यातही मराठी जनता जिवाचं रान करेल,’ असे गायकवाड यांनी ठणकावले.