
सामना प्रतिनिधी । मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही सामील झाल्याची माहिती आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये 26-22 असे जागावाटप झाले आहे. त्यापैकी प्रत्येकी एक जागा मित्रपक्षाला सोडण्याचे आघाडीने ठरवले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा, बहुजन विकास आघाडीला एक जागा सोडण्याचे ठरले आहे. तसेच एक जागा आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना सोडण्यत आली आहे.
Sources: There was 26-22 formula between Congress-NCP. Now they’ve given 2 seats from each one’s quota to allies. 2 seats for Swabhimani Shetkari Sanghatana, 1 for Bahujan Vikas Aghadi & 1 seat is left for independent MLA Ravi Rana, his wife Navneet Kaur might contest from there pic.twitter.com/dFmxI8SGr9
— ANI (@ANI) March 23, 2019
गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपांवर चर्चा होऊन निर्णय झाला. या निर्णयाची औपचारिक घोषणा भाकी आहे. जागावाटप होण्यापूर्वी काँग्रेस महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची घोषणा केली होती, तर राष्ट्रवादीनेही 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.



























































