मोदी ‘प्रपोगंडा के पापा’, आता डाळ शिजणार नाही जनता आरसा दाखवणार; राहुल गांधींचा हल्ला

संभ्रम आणि भीतीचे जाळे पह्डून आता सत्य बाहेर येत आहे, यावेळी प्रपोगंडाच्या पप्पांची डाळ शिजणार नाही. पापा का प्रपोगंडा आता चालणार नाही, कारण जनताच त्यांना आरसा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

एका तरुणाने पाठवलेला व्हिडिओ राहुल गांधी यांनी एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओतील जनतेच्या तीव्र प्रतिक्रियांवरून राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

व्हिडिओत काय…

पापाने युद्ध थांबवले, पापाने युद्ध थांबवले, असे म्हणताय, मग पापा आम्हाला नोकरी का देत नाहीत? मणिपूरच्या दंगली का थांबवत नाहीत, लडाखमध्ये एकजण 21 दिवसांपासून उपोषणाला बसला आहे, तिकडे पापा का लक्ष देत नाहीत? असे सवाल मोदी सरकारला करताना तरुणी व्हिडिओत दिसत आहे.