शेतकऱ्य़ांचा प्रवेश रोखण्यासाठी दिल्लीत उभारलेल्या तटबंदीवरून काँग्रेस व समाजवादी पार्टीने बुधवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार शेतकऱ्य़ांना घाबरतेय का? शेतकरी शत्रू आहेत का? शेतकरी मागे हटणार नाहीत, उलट सरकारलाच मागे हटावे लागेल, असे राहुल यांनी ठणकावून सांगितले. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनीही सरकारवर टीका केली. मी पाकिस्तान सीमेवरही अशी सुरक्षा पाहिली नाही, असे ते म्हणाले.
शेतकरी हेच देशाची ताकद आहेत. शेतकऱ्य़ांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारचे काम आहे, त्यांना घाबरवण्याचे नाही, असे राहुल गांधींनी नमूद केले. कृषी कायद्यांची अंमलबजावणी काही काळासाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव कायम आहे असे पंतप्रधान सांगतात.
मला वाटते, शेतकऱ्य़ांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. सरकारने आजच माघार घ्यावी यातच सर्वांचे भले आहे, असे त्यांनी केंद्राला सुचवले. याचवेळी गाजीपूर सीमेवरील काँक्रीटच्या भिंतीवरून सपाचे खासदार रामगोपाल यादव यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शेतकरी दिल्लीवर हल्ला करायला येणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
अभिनेता दीप सिधूसह इतर तिघांच्या अटकेसाठी बक्षीस
लाल किल्ल्यावर निशाण फडकवणाऱ्य़ा अभिनेता दीप सिधू, जुगराज सिंग आणि गुरजंत सिंग यांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच बुटा सर सुखदेव सिंग, जलबिर सिंग आणि इक्बाल सिंग या तिघांनी आंदोलकांना भडकवल्याचा आरोप असून त्यांच्या शोधासाठी प्रत्येकी 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.