हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान आहे, काँग्रेसची नरेंद्र मोदी व प्रफुल पटेलांवर टीका

अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर घातला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी देखील अजित पवार गटावर संतापले आहेत.

या घटनेवरून काँग्रेसने देखील अजित पवार गटावर व नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदींचा तो व्हिडीओ काँग्रेसने शेअर करत हा महाराष्ट्राचा व महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ”स्वतःला विश्र्वगुरू म्हणवून झाले आता स्वराज्य पण माझ्यामुळे निर्माण झाले अस म्हणायला हा माणूस कमी नाही करणार !! हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान आहे.”, अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसने त्या व्हिडीओ सोबत शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना मोदींसोबत त्यांच्या मित्रपक्षातील सर्व नेते होते. महाराष्ट्रातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.