
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्राी यांच्या जयंतीनिमित्त उद्या 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई काँग्रेसकडून शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. फोर्ट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. या शांती मार्चमध्ये महाविकास आघाडी, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती आणि सामाजिक संस्था, संघटना व इतर समविचारी पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.