
आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, काँग्रेस पक्षाने मंगळवारी आपल्या ४२ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीतील सर्वात मोठे नाव म्हणजे लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते आणि खासदार गौरव गोगोई, जे जोरहाट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांचे सुपुत्र गौरव गोगोई हे सध्या जोरहाट लोकसभेचे खासदार आहेत. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून काँग्रेसने राज्यात भाजपच्या हेमंत बिस्वा सरमा सरकारविरुद्ध तगडे आव्हान उभे केले आहे. गौरव गोगोई यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, त्यांना पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे.
पहिल्या यादीत काँग्रेसने ४२ जागांवर उमेदवार निश्चित केले असून, यात तरुण चेहरे आणि अनुभवी नेत्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. गौरव गोगोई यांच्यासोबतच खासदार रकीबुल हसन हे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
The Central Election Committee of the @INCIndia has selected the following persons as Congress candidates for the forthcoming Assam Legislative Assembly elections.
Best wishes to everyone! #AssamWithCongress pic.twitter.com/XWO41vdSYn
— Assam Congress (@INCAssam) March 3, 2026
























































