राजस्थानातील महापालिका, नगरपालिका निवडणूक भाजपला धक्का; काँग्रेस नंबर वन!

775

राजस्थानातील मतदारांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे. महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वाधिक 961 वॉर्डमध्ये विजयी होत काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजप दुसर्‍या क्रमांकावर आहे.

2018च्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानात भाजपला सत्ता गमवावी लागली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार राजस्थानात आले. आता स्थानिक संस्था निवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे.


काँग्रेसच्या खात्यात 23 पालिका

भरतपूर आणि बिकानेर महापालिकेत भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी, नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये भाजपच्या पदरी निराशा पडली आहे. निवडणुकीआधी 21 पालिका, परिषदांमध्ये भाजपची सत्ता होती. ती आता 6 वर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ताब्यात 23 नगरपालिका, परिषदा येतील, असा अंदाज आहे.

विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकलांप्रमाणेच आजचे निकाल आनंददायी आहेत. जनतेचा आमच्या सरकारच्या कामगिरीवर विश्वास आहे. – अशोक गेहलोतमुख्यमंत्री

ठळक वैशिष्ट्यै

  • गेल्या आठवडय़ात राजस्थानातील 24 जिल्ह्यांमधील 3 महापालिका, 18 नगरपरिषदा आणि 28 नगरपालिकांमध्ये मतदान झाले. 71.53 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
  • 2105 वॉर्डांपैकी काँग्रेस पक्षाचे उमेदवार 961 वॉर्डांमध्ये विजयी झाले असून, भाजपला 737 वॉर्डात विजय मिळाला. बहुजन समाज पक्षाला 16 तर अन्य पक्षांचे उमेदवार 5 ठिकाणी विजयी झाले.
  • पुढील आठवडय़ात महापौर आणि नगराध्यक्षांची निवड होईल. अनेक ठिकाणी काँग्रेसच्या ताब्यात नगरपरिषदा येणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या