महिलेचे व्हॉट्सअप स्टेटस वारंवार पाहाल तर होऊ शकतो गुन्हा

2192

एखाद्या महिलेचे व्हॉट्सऍप स्टेटस वारंवार पाहणे म्हणजे तिच्यावर पाळत ठेवणे आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हैदराबादमधील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त निकेश खाटमोडे पाटील पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा पाटील यांनी ही माहिती दिली. हैदराबादमधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी काही संघटनांनी केली. तेव्हा शहरातील महिला सुरक्षेबाबत त्यांनी माहितीही दिली. यावेळी पाटील यांनी महिला छेडछाडीच्या काही घटना सांगितल्या. पाटील म्हणाले की, “एक व्यक्ती एका तरुणीचा सातत्याने पाठलाग करत होता. त्याने तरुणीला कुठलाच त्रास दिला नाही. परंतु तरुणीची पार्श्वभूमी काय? तिच्या कुटुंबीयांमध्ये किती सदस्य आहेत याची माहिती तो तिच्या व्हॉट्सऍप स्टेटसवरून मिळवत होता. याचाच अर्थ तो स्टेटसवरून तरुणीवर पाळत ठेवत होता.” सातत्याने महिलांचे व्हॉट्सऍप स्टेटस पाहून पाळत ठेवल्यास त्या व्यक्तीवर कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असेही पाटील म्हणाले.

शहरात महिला सुरक्षेसाठी सर्वतोपरी कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील काही भागात शस्त्रधारी महिला पोलीस तैनात केले असून सर्व सीसीटीव्हीवर लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या