
सामना प्रतिनिधी, हिंगोली
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ आणि संडास सालेगाव परिसरातील रस्त्यांना जोडणाऱ्या पुलावरुन वरून पाणी वाहत असल्याने व पुल तुटल्याने जवळपास 35 गावांचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसापासून वरुणराजाने जोरदार बरसात सुरू केली आहे. हिंगोली व कळमनुरी तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस पावसाने हजेरी लावली. सांडस, सालेगावकडून कळमनुरी या तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावर नाल्यावरील पूल खचला आहे. तसेच जवळापांचाळ भागातील गावांचा देखील संपर्क तुटला आहे. ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत.



























































