
मुंबई महानगरपालिकेतील सुमारे 15 हजार पंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. या कामगारांना पालिकेने सेवेत कायम करावे, अशी मागणी वारंवार कामगारांमधून करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कंत्राटी कर्मचारी उद्या 24 जानेवारी रोजी पालिकेवर धडक मोर्चा काढणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यात 2007 पासून हे कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. 1995 मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त जनार्दन जाधव यांनी 10 हजार कंत्राटी सफाई कामगारांना पालिका सेवेत कायम केले होते. सद्यस्थितीत पालिकेत 51 हजार जागा रिक्त असून या पदांवर प्रामाणिकपणे काम करणाऱया पंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे. याबाबत अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंगळवारी 12 हजार कंत्राटी कामगार पालिका मुख्यालयावर धडकणार आहेत. याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येईल. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. याची दखल घेतली नाही तर 31 जानेवारीपासून आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मजदूर युनियनकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला.


























































