
सामना प्रतिनिधी । सांगली
आपल्या प्रामाणिक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी यांनी सांगलीत एका कार्यक्रमात धक्कादायक वक्त्यव्य केले आहे. ‘हिजड्यासोबत लग्न करून मुलं होतील परंतु सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसती’ असे गडकरी म्हणाले. सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते
गडकरी म्हणाले, “अतिरिक्त शुल्क साखरेचा विचार करून शेतकऱ्यांनी यापुढे उसाची लागवड करू नये, जर जास्त प्रमाणात साखर तयार झाली तर भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल” अशी भीती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केली तसेच “एक वेळ हिजड्या सोबत लग्न केलं तरी मुलं झाली असती मात्र सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसती असे माझ मत होते, मात्र या योजना आम्ही पूर्ण केल्या”
गडकरी बिनधास्त बोलतात. शनिवारी तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला केला होता. रविवारी टेंभू योजनेच्या कामांचा शुभारंभ करताना फडणवीस सरकारचा गौरव केला, पण त्यांची जीभ घसरलीच. हिजड्यांचे लग्न केले तर मुलं होतील, पण टेंभू योजना यशस्वी होणार नाही अशी आपली भावना होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमाल केली आणि काम पूर्ण केले असे ते म्हणाले.
गडकरी म्हणाले परदेशात साखरेला 20 रुपये दर आहे, आपल्या कडे 40 दर आहे, तरी ही ऊस दर प्रश्नी आपल्या कडे आंदोलने सुरू आहेत, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, “साखर कारखाना हा सोन्याची अंडी देणारी कोंबड़ी आहे.” मात्र कारखानदारांनी, शेतकऱ्यांचे आणि ऊसतोडणी मजुरांच शोषण करू नये आणि शेतकऱ्यांनी सुद्धा कारखाने बंद पडतील असे आंदोलने करता कामा नये असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
नितीन गडकरी यांची वादग्रस्त विधाने
- मल्ल्याने अनेक वर्षे नियमितपणे बँकांचे कर्ज फेडले, मात्र व्यवसायात अडचणी आल्याने त्याला हप्ते भरता आले नाहीत. मग त्याला कर्जबुडव्या म्हणायचं का?
- राजकारणात अपयशाची जबाबदारी घेणारे नेतृत्व हवे.
- आमच्या नेत्यांच्या तोंडात बोळा कोंबण्याची गरज आहे.
- 2014 मध्ये आम्ही आश्वासने दिली. आता सत्तेत आल्यावर जनता आश्वासनांची आठवण करून देते तेव्हा आम्ही फक्त हसतो.
- अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है





























































