कोरोनावर 4 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील काही भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे निर्माण होणारी गंभीर स्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार 4 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी देशात सर्वत्र विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोरोनासंबंधी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने बोलविलेली ही दुसरी सर्वपक्षीय बैठक आहे. मोदींच्या कोरोना व्हॅक्सीन कंपन्यांच्या दौऱयानंतरची ही पहिलीच महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित असतील. संसदीय कार्यमंत्रालयाकडून या ऑनलाईन बैठकीसंबंधी सर्व पक्षांच्या सभागृह नेत्यांना संपर्प साधून सूचना देण्यात आल्या आहेत.