
कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर सरकारमार्फत मोबाईलवर जनजागृतीसाठी वाजवली जाणारी कॉलर टय़ून लवकरच बंद होणार आहे. कोरोनाच्या नियमांबाबत जागरुक करणाऱ्या संदेशाची कॉलर टय़ून हटवण्याबाबत सरकारने विचार केला आहे. यासंदर्भात दूरसंचार विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्रव्यवहार केला आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. लोकांमध्ये संसर्गाबाबत पुरेशी जागरुकताही निर्माण झाली आहे. असे असतानाही मोबाईल कॉलपूर्वी कोरोनाची कॉलर टय़ून ऐकवली जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या कॉलला उशिर होतो. याबाबत तक्रारी आल्यानंतर सरकारने कोरोनाची कॉलर टय़ून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.



























































