
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेवर भर देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर लगेचच मोबाईलवर प्रमाणपत्र पाठवले जाते. परंतु या प्रमाणपत्रात नाव, जन्म तारीख, वर्ष किंवा लिंग यासारख्या चुका आढळून येत आहेत. जर अशा प्रकारची चूक असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. या चुका आपल्याला CoWIN अॅपमध्ये सुधारता येणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रमाणपत्रातील चुका सुधारण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सर्वप्रथम येथे क्लिक करा. http://cowin.gov.in जाऊन आपला 10 अंकी मोबाइल नंबर प्रविष्ट करून साइन इन करा. फोनवर प्राप्त केलेला सहा अंकी ओटीपी प्रविष्ट करा. त्यानंतर Account Details वर जा. ‘रेज एन इश्यू’ च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘Correction in certificate’ वर जा आणि प्रमाणपत्रात आवश्यक सुधारणा करा.




























































