
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला धडकी भरविली आहे मात्र याला पंढरपूरकर अपवाद आहेत कोरोनाच्या नानाची ‘टांग’ म्हणत पंढरपूरकरांनी आज सप्तरंगाची उधळण करीत रंगपंचमी सण जल्लोषात साजरा केला.
पंढरीचा पांडुरंग हा श्रीकृष्णाचा अवतार असल्याने पंढरीतील रंगपंचमीला आगळेवेगळे महत्व आहे. यमाई तलाव, तुळशी वृंदावन येथे श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे प्रांताधिकारी सचिन ढोले, डीवायएसपी डॉ सागर कवडे, नगराध्यक्षा साधना भोसले आदींच्या हस्ते नैसर्गिक सप्त रंगांची उधळून करुन पूजन करण्यात आले.
यावेळी डीजेच्या तालावर उपस्थित तरुणाईने एकच जल्लोष केला नगराध्यक्षा साधना भोसले यांना देखील डिजेवर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. यमाई तलाव वोकिंग ग्रूपच्या वतीने रंगपंचमीचे आयोजन केले जाते.
























































